Breaking News
Loading...
Thursday, October 9, 2008

पोर्णिमेची रात्र अधिक आज उजळली
आनंदाने वेडी वटवाघळे आज नाचली
घुबडे बघतात भर रात्रि भरून डोळे
रात्री संई मजसंवे हातात हात माळे
स्वागतास आज रजनी सजली
रात्रि फिरायला आज आमची जोड़ी निघाली
पोर्णिमेची रात्र अधिक आज उजळली

परसातली रातराणी जरा जास्तच बहरली
ओल्या अंगणात तिच्या संईची पाउले उमटली
रात पाखरे संई च्या खांद्यावर विसावली
संईच्या प्रेमात एक सुरात गुणगुणली
काजव्यानी संईची पंचारती ओवाळली
रात्रि फिरायला आज आमची जोड़ी निघाली
पोर्णिमेची रात्र अधिक आज उजळली

संईच्या प्रेमळ नयनानी रात्र भिजली
संईच्या पायघडीवर दवबिन्दुंची रांगोळी रंगली
पाहून सारे आज ती रात्रीत हरवली
मज ना कळे प्रेमात संई का पाघळली
रात्रि फिरायला आज आमची जोड़ी निघाली
पोर्णिमेची रात्र अधिक आज उजळली

एक लयीत पावले रात्रभर चालली
स्पंदने ह्रदयाची आज जूळली
संई आज पहिल्यांदा खुप बोलली
विषय संपले मग नजर वदली
रात्रि फिरायला आज आमची जोड़ी निघाली
पोर्णिमेची रात्र अधिक आज उजळली

उद्या अडकणार आपण लग्न बंधात
सप्त पदिच्या सात जन्मात
भाविषयाच्या अमावास्या अंधारात
कसे चालणार आपण या प्रवासात
बोलून असे संई आज रात्रि थोडी चिंतातुर झाली
रात्रि फिरायला आज आमची जोड़ी निघाली
पोर्णिमेची रात्र अधिक आज उजळली

प्रेमाचे दिवे लाउन वाटे वरती
घट्ट विणून विश्वासाची नाती
विसरून सारी दुखे रोज परतायचे घरटी
आशेचा सूर्योदय होई बघ आता आभाळी
सरली सारी रात्र परतुया आता माघारी
इकुन इतके संई बाहू पाशात विसावली
रात्रि फिरायला आज आमची जोड़ी निघाली
पोर्णिमेची रात्र अधिक आज उजळली

0 comments:

Post a Comment