Breaking News
Loading...
Thursday, October 9, 2008

.
कुणाला सांगणे काही नसावे...
कुणाशी मागणे काही नसावे...

कुठलाच प्रश्न नसावा...
कुठलेच उत्तर नसावे...

कुठलेच दृश नसावे...
कुठलाही भास नसावा...

एक अनामिक सुर असावा...
ज्याने हृदयाचा ठाव घ्यावा...

मोडून पडलेल्या जोमाला...
नवी जिद्द मिळावी...

सोडून निघालेल्या आत्म्याला...
नवी वाट दिसावी..

परत एकदा तो निवांत क्षण असावा...
जिथे काही नसावे...
काहीच नसावे...

0 comments:

Post a Comment