Breaking News
Loading...
Wednesday, October 15, 2008


** कोण जागत आहे ? **


तल्लखी अश्शी दिनभर साहत आहे
गोठले तर नाही काटे ? पाहत आहे

सामना आज दोन तुल्यबळांचा
कर्मदरिद्रीच " आज " धन मागत आहे

पिवो बासुंदी वा अमॄत कुणी
प्रेमाची नशा मी चाखत आहे

येईल आता " ती " गच्चीत यारो
झुळूक सुवासिक वाहत आहे

इथे सारे दिवाणे लाजर्‍या चंद्राचे
कोजागिरीसाठी कोण जागत आहे ?

0 comments:

Post a Comment