Breaking News
Loading...
Thursday, October 30, 2008

Info Post


क्षत करूनी कोणी
घाव उरी ठेवावा
भयग्रस्त एकांताचा
शरीरी काटा रहावा |

जळणार्‍या मेणबत्तीने
मेणाइतकेच जळावे
न सांगताच भाव
आपसूक कुणा कळावे |

तळहाती जलबिंदूने
मौत्यक रूप धरावे
माडीवरील मोगर्‍यानेही
निर्माल्यी पावावे |

कोवळ्या किरणांनी
क्षणभर सोनेरी व्हावे
राखराखीत मरुभुमीस
म्रुगजळाचे स्वप्न दिसावे |

एकरूप इतके पावावे
शरीरच सैलवावे
सहवासाच्या आठवानी
मन भरून यावे |

इतुके व्हावे तल्लीन
विश्वच यावे शरण
निद्रेस कवटाळताच
अवचित गाठावे मरण |

0 comments:

Post a Comment