Breaking News
Loading...
Thursday, October 9, 2008

हरवलय हो....हरवलय..
पहाटेची ओवी..
वासुदेवाच गाण..
आडावरची आंघोळ..
गड्याची साद..
माडावरची शाला..
गुरुजींच रागवण..
हरवलय हो.....

पाडावरच्या चिंचा..
आईच्या हातच कालवण..
पत्रावळीतल जेवण..
बैलांच्या घुंगुरमाला..
आमराईची सावली..
चोरून खाऊ खाण..
हरवलय हो....

दादाच रांगड़ प्रेम..
वहिनीच गोड लाजण..
बाबांचा धाक..
आईचा आधार..
आजीची गोधडी..
आजोबांचा परवचा..
हरवलय हो....

वेशीवरचा मारोती..
गाईच हम्बरण..
खड्या आवाजातल शुभंकरोति..
शुभ्र पिठोरी चांदण..
कट्यावरच्या गप्पा..
निवांत गाढ़ झोप..
हरवलय हो....


हरवली हो..हरवलय....
माझ गाव हरवलय..
माझ जगण हरवलय..
हरवलय हो.. खरच हरवलय...

0 comments:

Post a Comment