Breaking News
Loading...
Thursday, October 9, 2008

हर दिल काही व्यथा सांगते
त्याची कविता ऐकत जा
हर मन काही स्वप्न पहाते
त्याचे गाणे गुंफ़त जा

रस्त्याने कुजबुजत चालली
पौगंडातिल मुले फ़ुले
त्यांच्या शंका जिज्ञासांना
शब्दांतुन तू मांडत जा

घराघरातिल व्यथा सारख्या
चर्चा जगभर होने दो
जगभरच्या चर्चांचे मुद्दे
घराघरातुन सांडत जा

बुलंद स्वप्ने नवतरुणांना
धडपडणार्‍यां खांदा दे
धडधडणार्‍या हृदयांवरती
गुलाब पाणी शिंपत जा

कविता म्हणजे नसे खेळणे
वेळ दवडण्याचे फ़ुकटे
झरझर झरताना जे झुरते
काळिज ते सांभाळत जा

चिरतरुणांचा सुगंध बन तू
पिचलेल्यांचा अश्रू बन
दबलेल्यांचा झेंडा बन
रस्त्यारस्त्याने फ़डकत जा

कुबट कोपरा धरून खोकत्या
वृद्धांची काठी बन तू
बागेमध्ये बागडणार्‍या
कळ्यांसवेही खेळत जा

रानांतून जा हिरव्या हिरव्या
श्वास मोकळा घे तू खरा
धूर ओकत्या चिमण्यांवर तू
नोटीस बनुनी चिकटत जा

अशी नको तू, तशी नको तू
कोणी दिला अधिकार मला ?
कोणाच्याही बापाला तू
नकॊ घाबरू (!) बोलत जा

0 comments:

Post a Comment