Breaking News
Loading...
Monday, October 13, 2008


तन-मनाला वेढून टाकणारी ...

अवघ्या जीवनाला व्यापून उरलेली...

तुझ्या येण्याची प्रतीक्षा...

तुझ्या थरथरत्या स्पर्शांचा आठव...

माझ्या सर्वांगाला वेढून घेणारा स्पर्श..

अंग-अंगातून ठिणग्या फुलवित जाणारा...

शारीर भर उसळणाऱ्या लाटा...

एकामागून एक आदळत राहतात...

मागणीच्या लाटा...तृप्तिच्या किनार्यावर...

एक लाट अतृप्तिची परत जाणारी...

पुन्हा माग्निचा वेग घेउन येण्यासाठी..

प्रत्येक अणु-रेणू जागा होतो...

धावू लागतो बेलगाम...

शोधू लागतो तुला...

खुप खुप हव आहे...

असह्य होऊं जातो विरह...

वाटत....

वाटत...त्यान याव..

सर्व सर्व शांत कराव...

0 comments:

Post a Comment