Breaking News
Loading...
Thursday, October 9, 2008

ती बसली होती एका कोपर्यात
रंगहीन अदृश्य होंउंन
नुकताच ओघळला होता
गेला होता एक रंग तिला सोडून


मला रहायचय असच
अशा विचारात होती
असच ठेवायचे कोर मन
स्वतालाच समजावत होती


नाही काढायचे चित्र नवे
नाही भरायचे नवे रंगही
नाही भीरभीरु द्यायचे वेड्या मनाला
ना ऊमटूं द्यायचे त्यात तरंगही


असे काही दिवसही गेले
उठल्या मनावर काही रेघा, ओरखडे
तिचा निर्धार पक्का होता
तिला तोच रंग हवा होता


ऊडाला होता विश्वास तिचा
त्या श्रुष्टिच्या चित्रकारावरचा
माझाच रंग मला असा का
सोडून दुसर्या चित्रात जावा ? ?


मी सजवले होते मज़े सुंदर चित्र
भरले होते त्यात मोजकेच रंग
नको होती मला इंद्रधनूची झळाळी
नाही हवे होते रंग चंदेरी सोनेरी


आता ती सगळे सोडून बसली होती
तिच्या मनाचा कोरा कागद तसाच जपत होती
त्यावर पडू पहानार्या प्रत्येक रंगाला
ती स्वताहून दूर लोटत होती

एकदा आला तिच्याकड़े रंगांचा राजा
तोच तो सर्वा रंगानी भरलेला रंग पांढरा
तिच्या कळत नकळच
तो तिच्या कोरेपणात पूर्ण मिसळून गेला

त्याचाही होता पक्का निश्चय
द्यायचे होते तिला पूर्ण रंग नवे
फ़ुलवायचे होते त्याच मनावर
तेच मोजक्या रंगांचे चित्र नवे


कोरेपणाचाही असतो रंग पांढरा
असतात त्यातच तर सर्व रंगांच्या छठा
वेडे एक एक रंग उलघडून पहा
पुन्हा मिळेल तोच रंग हरवलेला


ह्या जगात चित्र असली जरी वेगवेगळी
तरी रंगमात्र सगळे सारखेच असतात
कुणाचे हरवले असले तरी
शोधले तर त्याच्या लाख छठा मिळतात


सात रंगानी बनलेली ही दुनिया
सात रंग सर्वांमधे असलेली ही दुनिया
तरी स्वताचा कोरेपणा जपणारी ही दुनिया
सर्वाना सगळे रंग देणारी ही दुनिया


तू ही उचल हवा तो रंग
उठूदेत तुझ्या मनात पुन्हा नवे तरंग
सजव तुझे चित्र सोडून कोरेपणा
पहा ज़रा या नव्या छठा


शेवटी सगळे कोरेच राहते
त्या मुळेच आत्ता रंगायच
हवा तो रंग हव्या त्या छठेत
आपले चित्र रंगवायाच


आता शेवट माहिती नाही
पण पांढर्या रंगाचा वेदा विश्वास आहे
रंगवेल ती तिचे चित्र पुन्हा
सापडेल तिला हावी असलेली त्या रंगाची छठा


आणि तो..


तो निघाला पुन्हा त्याच वाटेने
शोधायला असाच कोरेपणा
द्यायला पुन्हा रंग नवे
फुलवायला पुन्हा नव्या तिला

0 comments:

Post a Comment