Breaking News
Loading...
Thursday, October 9, 2008

प्रिय संई तुला एक विनंती

रोज नव्या रुपाने येतेस स्वप्नात
जीवनात माझ्या येशील का ?
डोळ्याच्या त्या प्रेम सागरात
मला हरपु देशील का ?

काळ्या भोर केसांशी खेळत
पावसात फिरायला येशील का ?
केसात माझा चेहरा लपवून
सुगंध दरवळु देशील का ?


इवल्याश्या नकटया नाकावर राग घेउन
वाट पाहत थांबशील का ?
मी उशीर केला म्हणुन
माझ्या पाशी रडशील का ?

ओठांच्या दोन पाकळ्या उघडून
माझे तू नाव घेशील का ?
इश्श म्हणुन चेहरा लपवत
नखरेल पणे रूसशील का ?

कविते मध्ये माझ्या गुंतून
माझ्या स्वप्नात हरवशील का ?
एक एक स्वप्न वाचून
सत्यात कधी अवतारशिल का ?

0 comments:

Post a Comment