Breaking News
Loading...
Saturday, October 11, 2008

तुले म्हनतीच सारे
बळीराजाचा सखा रे,
का लावितोस घोर
मझ्या जीवाला असा रे.

काळ्या ढेकळामधुन,
पीक सोन्याचे रे आल,
तुझ्या वादळ वार्यान,
सम्द पाण्यातच न्हाल.

माझ्या डोळ्यातले ढग
तुझ्या सन्ग बरसती,
सान्ग माझ्या माय-बापा
चुक झाली रे कोणती?

चीमटा पोटाले काढते
माझ्या लेकरान्ची माय,
तुझा पसारा पाहुन
रडे मोकलुन धाय.


हात जोडीतो रे सख्या
नको होउस बेभान,
आता घालीतो रे तुले
माझ्या रगताची आन.

0 comments:

Post a Comment