Breaking News
Loading...
Tuesday, March 9, 2010

Info Post
थांब थांब सखे
तु जाऊ नकोस

आलीस तु मनात
कोरते तुला ह्रुदयात
शब्दात गुंफ़ते
कागदावर उतरवते
थांब थांब सखे तु जाऊ नकोस


थांब थांब सखे
तु रुसु नकोस
तु पळु नकोस
तु वळु नकोस
थांब थांब सखे तु जाऊ नकोस


निवांत हो ना
ऐकुन घे ना
फुलांची लादी घे
स्वप्नांची उषी घे

मी येते सोबत,
चल करु सफ़र
उंच उंच आकाशी
तार्यांच्या दुनियेत
पावसाच्या ढगात
चमकणार्या विजेत
थांब थांब सखे तु जाऊ नकोस

थांब थांब सखे
सजवते तुला
झुलवते झुला
वार्याच्या लहरीत
फिरव ना मला
थांब थांब सखे तु जाऊ नकोस


थांबली सखी ,सजली सखी
शब्दांच्या गुंफ़णात गुंतली सखी
कवितेच्या दालनात पोचली सखी
मनात सर्वांच्या बैसली सखी

0 comments:

Post a Comment