Breaking News
Loading...
Tuesday, January 19, 2010

जीवन वाटेवर अनेक जुळतात नाती
काही कोमेजती,काही फ़ुलतात नाती...
दु:ख देती तसेच सुखावतात नाती
कुणास आयुष्यभर छळतात नाती...

वात्सल्य,प्रेम,मायेत झुलतात नाती
विश्वासाने हळूहळू खुलतात नाती...
कुठे हरवती कुठे मिळतात नाती
क्षणिक स्वार्थापोटी भुलतात नाती...

हातात हात घेऊनी चालतात नाती
सुखात जवळ दु:खात पळतात नाती...
काही पणती सारखी जळतात नाती
कायमची ह्रुदयाला काही सलतात नाती...

मनात जरी रुजतात नाती

प्रेम, मायेने हसतात नाती...
अविश्वास होता थोडासा
एकमेकांवर का रुसतात नाती...?

काही वळणावर हरवतात नाती
स्वार्थापोटी मिरवतात नाती...
आपुलकी कुठे असते हल्ली
माणसे कुठे टिकवतात नाती...?

घास प्रेमाचा भरवतात नाती
धडा नात्यांचा गिरवतात नाती
गैरसमज मनात जागता थोडासा
कायमची का दुरावतात नाती..?

0 comments:

Post a Comment