Breaking News
Loading...
Wednesday, October 28, 2009

पहाटे सूर्य अजून झोपला असता ..
मी एक आकार पहिला
स्मशानाबाहेर होता..
निराकार उभा राहिला ..

हात रक्ताळलेले ..
तरीही चेहरा उजळलेला ..
कोण असावे असले?
मी "देव" म्हणाला..

तू ..खून केला?
तो पर्यंत राख धुतली..
तू ..पण त्यातला ?
पापणी हि नाही हलली..

अरे नाही ..
काळ आला होता..
मी फक्त ..
वेळ पाळली..!!

असं इतकं सहज?
एवढं सोप्पं ..?
कोण म्हणालं सहज..?
मी गप्प..

निर्मिती केलीये आधी..
चुकलो काही ठिकाणी..
कोण करणार सारं नीट..?
मग आपणच व्हायचं थोडं धीट..

तुलाही राग येतो?
देव: ह्म्म्म
तू मला पकडतो?
मी: ह्म्म्म

नाही कसं..येतो राग..
कोणाचा? का?
स्वत:चा ..
आहे कोण दुसरा ..?

मीच बनवणारा..
मीच चुकणारा ..
मीच मारणारा..
अन..मीच मरणारा ..


आजी:
चप्पल सरळ कर
उलटी ठेऊ नको ...
का?
विचारायचं नाही..
देवाच असतं..

तुपाची वात तेलाला लावू नको..
का?
विचारायचं नाही..
देवाच असतं..

रात्रीच झाडू नको..
का?
विचारायचं नाही..
देवाच असतं..

झंप्या अन चिंधी आलेत..
पोराला जाऊ देऊ नको..
का?
विचारायचं नाही..
देवाच असतं..

मी: "आई कुठाय "?
अंगणात ...
का?
विचारायचं नाही..
देवाच असतं..

आज आई जेवणार नाही?
का?
विचारायचं नाही..
देवाच असतं..

आजी कुठंय?
देवाकडे गेली..
आई तू इतका जेवली.. का?
देव पावला...

0 comments:

Post a Comment