Breaking News
Loading...
Tuesday, September 29, 2009

Info Post


आळस अंगभर पसरलेला असताना,
पक्षांची किलबिल करत येते,
स्वप्नात काहीतरी महत्वाच घडणार,
तेवढ्यात खाडकन जाग देते.
ही सकाळ ..ही अशी का वागते.

काम भरात चालु असताना,
पोटातली आग छळू लागते,
मग येते ही उन्हाचा मारा घेउन,
सगळच शरीर जळू लागते.
ही दुपार ....ही अशी का वागते.

हिची सोबत मला खुप भावते ,
प्रियेच्या स्म्रुतित घेउन जाते,
पण सरता सरता रंग हिचे ते,
अस्वस्थ जीवाला करून जाते .
ही संध्याकाळ..ही अशी का वागते.

श्रुंगारात बुडवते हिची शहारनारी साथ,
कुशिवरती फिरणारे थंड कोमल हाथ,
नयनी नीज सुखाची अन स्वप्न मनाला देते,
जाऊ नको म्हनल तरी का निघून जाते ?
ही रात्र...ही अशी का वागते.

0 comments:

Post a Comment