Breaking News
Loading...
Monday, February 9, 2009


कितीही नाही म्हणालो तरी....
आस आहे
माझ्या स्वप्नातही एक जिवंत तेवत ज्योत आहे !!
शेवटी प्रत्येकाचा ईथ....
काही ना काही स्वार्थ आहे
खरं तर जगणेही ही एक कला आहे
कुणी कस जगाव...
हा मात्र प्रत्येकाचा अधिकार आहे !!
द्यावी का मुठमाती स्वार्थास.....
कि उपभोगावे स्वप्न पायदळी तुडवुन इतरांच्या अपेक्षा
हे तत्त्व संस्कारात थिजलेल... ...त्यागात भिजलेल
हे सत्य ज्याने त्याने पचवाव !!
कितीही नाही म्हणालो तरी....
आस आहे
माझ्या स्वप्नातही एक जिवंत तेवत ज्योत आहे !!
बाळगावी स्वप्न उराशी ... नाही असे नाही
साधावा स्वार्थही..... माझी मुळीच ना नाही
पण आपल्या स्वार्थातही इतरांचा गाव वसावा
स्वप्न आपले फुलतानांही त्याचा गंध इतरांतुन दरवळावा..........
कितीही नाही म्हणालो तरी....
आस आहे
माझ्या स्वप्नातही एक जिवंत तेवत ज्योत आहे !!

0 comments:

Post a Comment